Premium

चंद्रपूरचे खासदार धानोरकर यांना उपचारांसाठी दिल्लीत हलवले

खा. धानोरकर यांच्या वडिलांचे काल निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत ते सहभागी नव्हते.

congress mp balu dhanorkar treatment in new delhi
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर

नागपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरातून दिल्लीत विमानाद्वारे हलवण्यात आले. खा. धानोरकर यांच्या वडिलांचे काल निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत ते सहभागी नव्हते. त्यांच्यावर नागपूरमध्ये अरहिंत इस्पितळात उपचार सुरू होते. पोटाच्या विकाराने ते त्रस्त होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरातून दिल्लीत हलवले. अशी माहिती धानोरकर यांच्या आप्तेष्टांनी दिली. संबंधित डॉक्टरांनी याबाबत काही सांगितले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकृती स्थिर – धानोरकर

शनिवार २७ मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परतू रविवारी पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे आलो आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, असे खासदार बाळू धानोरकर, यांनी कळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 14:10 IST
Next Story
‘मनरेगा’च्या कामावर ७१ हजार ६४३ मजूर कार्यरत; चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी