वर्धा : मतदारांपर्यंत थेट संपर्क केल्याशिवाय पर्याय नाही, हे अखेर समजलेल्या काँग्रेस नेत्यांना त्यासाठी गाव पातळीवर पोहोचणे आवश्यक वाटत आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यासाठी कार्यक्रमच दिला असून हे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आपल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. प्रदेशची कार्यकारिणी जंबो ठेवत असल्याची टीका होत असते. आता चतुर पटोले यांनी या प्रदेश नेत्यांना जिल्हा समन्वयक नेमत गावागावात जाण्याचे फर्मान सोडले. १५ ऑगस्टपर्यंत त्यांना कामाचा हिशोब मागितला आहे.




मतदार संपर्क अभियानअंतर्गत या समन्वयक नेत्यांना ग्राम काँग्रेस समिती, प्रभाग समिती व बूथ समिती सक्षम करण्याची जबाबदारी आहे. विदर्भातील जिल्हा समन्वयक असे –
नागपूर विभाग
वर्धा अमर वऱ्हाडे, नागपूर ग्रामीण हरिभाऊ मोहोड व रवींद्र दरेकर, नागपूर शहर पंकज गुड्डेवार, भंडारा राजा तिडके व पी.जी.कटरे, गोंदिया विजय नळे व पी.जी. कटरे , चंद्रपूर ग्रामीण संजय महाकाळकर, चंद्रपूर शहर बिपिन बोवर, गडचिरोली शिवा राव.
हेही वाचा – भाजपकडून इच्छुकांच्या आशेवर पाणी!, निवडणूक प्रमुख केल्याने उमेदवारीचा दावा संपुष्टात?
अमरावती विभाग
बुलढाणा मदन भरगड व दिलीप भोजराज, वाशिम डॉ.स्वाती वाकेकर, अकोला ग्रामीण नंदकुमार कुईटे, अकोला शहर जावेद परवेझ अन्सारी, यवतमाळ प्रशांत गावंडे व रामविजय बुरुंगले, अमरावती ग्रामीण प्रकाश तायडे, अमरावती शहर डॉ. झिशान हुसेन. हे सर्व समन्वयक प्रदेश चिटणीस आहेत. यांच्या कामाचा अहवाल राज्य समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष भा. इ.नगराळे यांना दिल्या जाणार आहे.