नागपूर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी रविवारी नागपुरात दोन मतदारसंघात रोड-शो करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांचा रोड-शो आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दुपारी २ वाजता प्रियंका गांधी पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत ‘रोड-शो’ करणार आहेत. त्यानंतर मध्य नागपूर मतदार संघातील महाल, गांधी गेट चौक ते कोतवाली पोलीस ठाणे मार्गे बडकस चौकापर्यंत मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळकेच्या प्रचारासाठी रोड-शो’ करणार आहेत.

प्रियंका गांधी पहिल्यांदाच पश्चिम नागपूरच्या जनतेसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे शहर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यापूर्वी गांधी कुटुंबातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी नागपुरात प्रचारासाठी आले होते. मात्र, प्रियंका गांधी यांचा हा पहिलाच दौरा आहे. पश्चिम नागपुरातील ‘रोड-शो’मध्ये प्रियंका गांधींची उपस्थिती ही नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरेल. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली.

Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
National Sports Championship inaugurated in Uttarakhand sports news
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप

हेही वाचा……तर भाजप, काँग्रेसला बाहेर ठेऊन सत्तास्थापनेचा नवा प्रयोग, आंबेडकर

प्रियंका गांधी पहिल्यांदाच पश्चिम नागपुरच्या जनतेसोबत संवाद साधत असल्याने शहर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. प्रियंका गांधी यांचा हा पहिलाच पश्चिम विधासभेच्या दौऱ्याची उत्सुकताच आणखी वाढली आहे. पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारार्थ भव्य ‘रोड-शो’मध्ये प्रियंका गांधींची उपस्थिती ही नवी उर्जा निर्माण करणार ठरेल, नागपुरात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे उत्साहात स्वागत शहरात ठिक-ठिकाणी करणार असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली. प्रियंका गांधीच्या पश्चिम विधानसभाक्षेत्रातील ‘रोड-शो’ हा पुढे मध्य नागपुरात गांधी गेट चौक ते कोतवाली पुलिस स्टेशन मार्गे बडकस चौकापर्यंत मध्य नागपुरचे उमेदवार बंटी शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा…नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना

या ठिकाणी रोड-शो

प्रियंका गांधी यांचा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात रविवारी दुपारी २ वाजता अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत ‘रोड-शो’ होणार आहे. तर मध्य नागपूर मतदारसंघात दुपारी ३ वाजता महाल, गांधी गेट चौक ते कोतवाली पुलिस स्टेशन मार्गे बडकस चौकापर्यंत राहणार आहे.

Story img Loader