अदानी उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. हा पैसा सुरक्षित रहावा व अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्‍या वतीने आज येथील श्‍याम चौकातील स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या कार्यालयासमोर आंदोलन करण्‍यात आले. काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे नेतृत्वात कार्यकर्त्‍यांनी निदर्शने केली आणि सरकारच्‍या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- शिंदे गटाशी युतीचा विदर्भात भाजपला काहीच फायदा झाला नाही

काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतींच्या विरोधात नाही. परंतु काही खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. अदानी उद्योग समुहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे, असे आमदार बळवंत वानखडे यांनी सांगितले.

हेही वाचा- “काही लोक नोंदणी करूनही…”; अमोल मिटकरींचा नाव न घेता रणजीत पाटलांना टोला!

आंदोलनादरम्‍यान कडक पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. आंदोलनाम माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आदी सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protest in amravati against industrialist adani and modi government mma 73 dpj
First published on: 06-02-2023 at 14:13 IST