पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुरक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेसने सोमवारी राज्यभर आंदोलन पुकारले आणि नागपुरातील किंग्स वे वरील एसबीआय व एलआयसीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.

हेही वाचा- अकोला : ‘अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी करा’, ‘एसबीआय’पुढे काँग्रेसचे धरणे

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी अनिस अहमद, महिला शहराध्य नॅश अली, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा, संदेश सिंगलकर, दिनेश बानाबाकोडे, प्रशांत धवड सहभागी झाले होते.

हेही वाचा- अमरावती : अदानी, मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक; स्टेट बँकेसमोर निदर्शने

अदानीचा गैरकारभार उघड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून आहे. संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत, परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. काँग्रेस पक्ष एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने जनतेच्या हितासाठी मोदी सरकारला जाब विचारत आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.