नागपूर : काँग्रेसने शुक्रवारी मशाल पदयात्रा काढून केंद्रातील भाजपच्या लोकशाही विरोधी धोरणाचा कडाडून विरोध केला.  ईडीचा धाक दाखवून राज्यातील आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप  काँग्रेस नेत्यांनी केला.

 देशात वाढती महागाई, नोटबंदीमुळे झालेले लोकांचे हाल, महिलांवर अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण व आता अग्निपथ योजनेतून सुशिक्षित बरोजगारावरील अन्याय होत असल्याचा आरोप करीत संविधान चौक ते व्हेरायटी चौक दरम्यान ही मशाल पदयात्रा काढण्यात आली.  या मशाल मोर्चात काँग्रेस सेवादलचे के. के. पांडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव नरेंद्र जिचकार, काँग्रेसचे सहसचिव नितीन कुंभलकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय दुबे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी वणवे, प्रदेश काँग्रेस सचिव  कमलेश समर्थ आदी उपस्थित होते.