scorecardresearch

बुलढाणा: निवडणूक विभागात कार्यरत शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई विजय सुशीर( ४०) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली.

suicide
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

बुलढाणा: बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई विजय सुशीर( ४०) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, शनिवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. ते शासकीय निवासस्थानात राहत होते. ही बाब लक्षात येताच सुशीर कुटुंब व शेजारील कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व बुलढाणा पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. दीर्घ काळ जिल्हाधिकारी कक्षात कार्यरत सुशीर यांची अलीकडेच जिल्हा कचेरीतील निवडणूक विभागात बदली झाली होती. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सहकारी कर्मचारी वर्गात लोकप्रिय होते. त्यामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 15:03 IST

संबंधित बातम्या