लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला केला.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

यानंतर आता महाराष्ट्र भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपच्या ट्विटरवून राहुल गांधी दाखवत असलेल्या संविधानाच्या पुस्तकाची सर्व पाने कोरी असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून संविधानाची हत्या केली जात असल्याचा आरोप केला.

आणखी वाचा-योगी आदित्‍यनाथ म्हणतात,‘ हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्यांना धडा…’

संविधान विरोधी काँग्रेसला जनताच धडा शिकवेल

काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहूल गांधी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी काँग्रेसला जनताच धडा शिकवेल.

चिनचे संविधान असल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे चिनचे संविधान हातात घेत फिरत असल्याचा दावा करण्यात आला होता. सोशल मीडियात राहुल गांधींचा फोटो आणि हातात संविधान असलेला फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात हे शेअरही होत आहे.

आणखी वाचा-“विरोधकांच्या महा‘अडाणी’ आघाडीला देश व धर्माची…” वाशीममध्ये कडाडले योगी आदित्यनाथ

फॅक्ट चेकमध्ये दावा ठरला खोटा

भारताच्या संविधानाचे कव्हर निळ्या रंगाचे आहे. चीनच्या संविधानाचे कव्हर लाल रंगाचे आहे. राहुल गांधी यांच्या हातात चीनचे संविधान आहे असा आरोप झाला होता. आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हेमंत बिस्वा सरमा यांनीही हा दावा केला होता. यानंतर आजतकच्या फॅक्ट चेकमध्ये या व्हायरल दाव्याची पडताळणी केली तेव्हा राहुल गांधी त्यांच्या रॅलीत चीनचे नाही तर भारतीय संविधान दाखवत असल्याचे आढळले. लाल कव्हर असलेले हे संविधान एक पॉकेट इडिशन आहे ज्याला ईस्टर्न बुक कंपनीने प्रकाशित केला.

लाल संविधानावरून फडणवीसांकडूनही आरोप

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना लक्ष्य केले आहे. “भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.