अनैतिक संबंधातून बांधकाम ठेकेदाराचा खून

या प्रकरणी आरोपी मजुरास पोलिसांनी शिवनीतून अटक केली. विनोद मडावी (३०, शिवनी-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

अनैतिक संबंधातून बांधकाम ठेकेदाराचा खून
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : अनैतिक संबंध आणि कामाच्या पैशावरून बांधकाम ठेकेदाराच्या डोक्यात हातोडीने वार करून एका मजुराने खून केला. ही घटना आज गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी मजुरास पोलिसांनी शिवनीतून अटक केली. विनोद मडावी (३०, शिवनी-मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरपूरमधील मेट्रो सीटी ०३ येथे बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाचा ठेका मध्यप्रदेशातील बालाघाट येथील मनोज सुखचंद पाटील (२७) याला देण्यात आला होता. त्याने मध्यप्रदेशातून बांधकामासाठी बरेच मजूर नागपुरात आणले होते. त्यात आरोपी विनोद मडावीचाही समावेश होता. विनोदने काही दिवस काम केल्यानंतर शिवनीतून एका ३२ वर्षीय विवाहित महिलेला नागपुरात आणले होेते. त्या महिलेचे विनोद मडावीसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याच्या खोलीत राहात होती. त्या महिलेशी मनोज पाटीलची मैत्री झाली. त्यामुळे मनोजसुद्धा विनोदच्या घरी मुक्कामी थांत होता. त्यामुळे विनोदला त्याचा राग यायचा. बुधवारी रात्री दोघेही दारू पिऊन घरी आले.

हेही वाचा >>> गडचिरोली : प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केली आईची हत्या

विनोदने ठेकेदार मनोजला मजुरीचे ५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, मनोजने त्याला हजार रुपये देऊन उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या विनोदने हातोडीने मनोजचे डोके ठेचून काढले. त्यानंतर त्या महिलेला दुचाकीवर बसवून तेथून पळून गेला. गरुवारी सकाळी काही मजुर विनोदला बोलवायला गेले असता मनोजचा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी मुख्य ठेकेदार आशय मांडवकर याच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोदला शिवनीतून अटक केली.

हेही वाचा >>> बुलढाणा : पर्यवेक्षक व मुकादमच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू; मृत व आरोपी परप्रांतीय

अनैतिक संबंधाची चर्चा

ती महिला विनोदची पत्नी नसून प्रेयसी आहे. तिला त्याने मध्यप्रदेशातून नागपुरात पळवून आणले होते. तिची ठेकेदार मनोजशीही मैत्री झाली. दोघांची मैत्री विनोदला खुपत होती. विनोदने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते तर मनोज तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्याच्या तयारीत होता. विनोदला प्रेमभंग व्हायची भीती असल्यामुळे त्याने मनोजचा काटा काढला, अशी चर्चा बांधकाम मजुरांमध्ये होती. मात्र, पोलिसांनी या शक्यतेला नकार दिला.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Construction worker killed contractor over immoral relationship zws

Next Story
फडणवीसांसाठी ब्राह्मण महासंघाचं नड्डांना पत्र, मोदींचा उल्लेख करत केली मोठी मागणी, म्हणाले “मोदींनंतर भाजपात…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी