गोमूत्रात ‘ई-कोलाय’सह १४ प्रकारचे हानिकारक जिवाणू असतात. त्यामुळे थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. या धक्कादायक निष्कर्षामुळे गोमूत्रावरून नवा वाद निर्माण झाला आहे. परंतु, ‘गोविज्ञान अनुसंधान केंद्रा’ने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हा दावा खोडून काढला.

संस्था मागील २८ वर्षांपासून यावर संशोधन करत असून गोमूत्र अनेक आजारांवर उपायकारक ठरल्याचा दावा यावेळी राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी सदस्य सुनील मानसिंहका यांनी केला. गोविज्ञान अनुसंधान केंद्र गोमूत्रावर २८ वर्षांपासून संशोधन करत आहे. यामध्ये नीरी आणि अन्य संस्थांनी मिळून पाच ‘पेटंट’ दिले आहेत. आज अनेक वैद्य आणि आयुर्वेदिक डॉक्टरही रुग्णांना गोमूत्राचे औषध घेण्याचा सल्ला देतात. अनेक रुग्ण यामुळे बरे झाले आहेत. कर्करोगासारख्या आजारावरही गोमूत्र उपायकारक ठरले आहे. त्यामुळे ते आरोग्यास अपायकारक असल्याचा दावा साफ खोटा असल्याची माहिती मानसिंहका यांनी दिली. ऋषी, मुनी आणि वेद, पुराणांमध्येही गोमूत्र, दूध, दही यांचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे गोमूत्राचे महत्त्व नाकारणे चुकीचे आहे. आज देशात रोज पाच ते दहा लाख लोग गोमूत्र अर्क व यापासून तयार होणाऱ्या अन्य औषधांचे सेवन करतात. आजपर्यंत कुणालाही नुकसान झाले नाही उलट फायदाच झाला असल्याचा दावाही त्यांनी केला.

Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
Anandacha Shidha closed for two months due to code of conduct Prevention of free goods circulation
‘आनंदाचा शिधा’ दोन महिने बंद; आचारसंहितेमुळे मोफत वस्तू वाटपास प्रतिबंध