नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर शनिवारी दुपारी १२ वाजता नागपुरातील रेशीमबाग मैदानातून ऊर्जामंत्री यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा संविधान चौकात अडवला असून आंदोलकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांकडे कार्यरत कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करावे, वेतनवाढ व हरयाणा सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. शासनाकडेही बऱ्याचदा मागणी केली गेली. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

Chief Minister Eknath Shinde testimony regarding Irshalwadi displaced houses
इरशाळवाडी विस्थापितांना हक्काची घरे मिळणार; निवडणूक आचारसहिंता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
chinchwad ncp latest marathi news
पिंपरी : चिंचवडची जागा न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजितदादांना इशारा
Offensive post about Mahatma Gandhi on social media in buldhana
बुलढाणा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’! युवक सत्ताधारी पक्षाचा…
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
Offensive remarks against Chhagan Bhujbal,
भुजबळांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, संशयितास पोलीस कोठडी
Chandrashekhar Bawankule organization,
बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, मविआ नेत्यांकडून भाजप लक्ष्य
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई

हेही वाचा…“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….

दरम्यान, या वीज कंपन्यांतील सुमारे ४५ हजार कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी शेवटी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने शनिवारी रेशीमबाग मैदानातून थेट ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले. हा मोर्चा संविधान चौकात पोलिसांनी रोखला. त्यानंतर आंदोलकांनी येथे ठिय्या देत आमरण उपोषण सुरू केले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी फडणवीस यांच्याशी देवगिरीवर बैठक घडवून देण्याचे आश्वासन दिले. आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईस्तोवर हटणार नसल्याची भूमिका घेतल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सचिन मेंगाळे, उमेश आनेराव, राहुल बोडके, अभिजित माहुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ऊर्जामंत्र्यांकडून बोलावणे आल्यास त्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेकडून शिष्टमंडळ जाणार आहे.

हेही वाचा…सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…

आंदोलकांचे म्हणणे काय?

राज्याच्या अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी संघाच्या प्रतिनिधीची २० ऑगस्टला मुंबईतील मंत्रालयात बैठक घेतली होती. याप्रसंगी कंत्राटी कामगारांना कायम करता येत नाही, ६० वर्षे शाश्वत रोजगाराची हमी देता येत नसल्यासह इतरही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. त्यावर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासह इतरही कामगार संघटनांकडून संताप व्यक्त करत नाराजी बोलून दाखवली गेली. त्यानंतर वीज कामगार संघटनांकडून आंदोलनाची घोषणा केली गेली होती. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असतांनाही महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने नागपुरात मोर्चा काढला असून न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.