राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपा व काँग्रेसमध्ये तू तू मैं मैं अनुभवायला मिळाली. झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्के वाटपाच्या विषयावर चर्चा होत असताना भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यामध्ये काही वेळ वादविवाद झाला.

हेही वाचा- नागपूर : साहित्य संमेलनाच्या ‘लोगो’चे गडकरी यांच्या हस्ते अनावरण

खोपडे यांनी वंजारी यांना हवेत तीर मारू नका असे म्हटले. महाविकास आघाडीच्या राज्यात मालकी हक्काचे वाटप नियमाने झाले नसल्याचा आरोप खोपडे यांनी केला. या दोन्ही आमदारामध्ये तू तू मैें मैं सुरू असताना पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले आणि माझ्या अध्यक्षतेखाली होत असलेली बैठक नियमाने होईल. राजशिष्टाचार हा बैठकीत पाळला गेला पाहिजे, असे त्यांनी दोन्ही आमदारांना सांगितले.

हेही वाचा- दिवाळीपूर्वी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन? लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता

कामठीचे आमदार व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यामध्ये पशुधन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जनावरांवरून आरोप प्रत्यारोप झाले. श्रीमंताकडे जनावरांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप सावरकर यांनी केल्यावर त्यांचा मुद्या खोडून काढत त्यावर बर्वे यांनी सावरकर पशुधन संबंधीत सर्व अहवाल तयार असून त्याबाबत चौकशी करा, अशी सूचना केली. यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना फडणवीस यांनी मध्यस्थी करत या विषयाची चौकशी करण्याबाबतची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

हेही वाचा- अर्थमंत्रीच पालकमंत्री असल्याने नागपूरसाठी निधीची चिंताच नको; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना आम्हाला दुय्यम वागणूकीसह एक पैशाचाही निधी दिला नसल्याचा आरोप सावरकर यांनी केला. त्यावर अभिजित वंजारी आता तुमचेच सरकार आहे, घ्या ना निधी म्हणत सावरकरांना टोमणा मारला. यावेळी भाजपच्या अनेक आमदारांनी गेल्या अडीच वर्षात जिल्हा नियोजनमधून निधी न मिळाल्याची तक्रार या बैठकीत केली.