राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०९ वा दीक्षांत सोहळा बुधवार २५ मे रोजी आयोजित करण्यात आला असून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रामुख्याने उपस्थित राहतील. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक पदक व पारितोषिके मिळवणात पहिल्या चारही क्रमांकावर विद्यार्थिनी आहेत हे विशेष. यामध्ये बी.ए. एलएलबीच्या अपराजित अरुणकुमार गुप्ता हिला ८ सुवर्ण पदके आणि दोन पारितोषिके, एम.एसस्सीच्या निधी शाहू हिला ४ सुवर्ण व एक रौप्य पदक, एम.ए.मराठीच्या शुभांगी देविदास धरगावे हिला चार सुवर्ण पदके व एक पारितोषिक तर एम.ए. डॉ. आंबेडकर विचारधाराच्रूा श्रीया नंदगवळी हिला ४ गुणव आणि एक पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. करोनामुळे परीक्षेची गुणवत्ता घसरल्याने यंदा पदवी, पदव्युत्तरच्या पदव्यामध्ये मोठी वाढ झाली असून ७७ हजार ६७८ विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप केले जाणार आहे.