वर्धा : विधानसभा निवडणुकीत विजयाचा निर्धार ठेवून प्रत्येक उमेदवार कामास लागला आहे. सर्व ते प्रयत्न करू लागला आहे. राजकीय भविष्य ठरविणाऱ्या या लढाईत उमेदवारसाठी कुटुंब तर कामाला लागतेच, पण त्याचे हितचिंतक, लाभार्थी, त्याच्यावर प्रेम करणारे, त्याच्या स्वभावार लुब्ध होणारे असर सर्व हातचे काम सोडून लाडक्या उमेदवाराच्या मतदारसंघात ठिय्या देऊन बसतात.

आता हेच बघा, राज्याचे सर्वोच्च सत्ताकेंद्र असलेले निवास म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान  मुंबईतील वर्षां बंगला होय. येथील सर्व ते काही उत्तमच. वर्षां बंगल्यावरील आगंतूक तसेच मुख्यमंत्री व अन्य यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी असणारा कुक अर्थात खानसामा हा देखील या निवास्थानातील महत्वाचा व्यक्ती ठरतो. राजकुमार गुप्ता हे त्याचे नाव. मूळचा नागपूरचा. २०११ मध्ये वर्षां बंगल्यावर आला. मात्र तशी ओळख तो कोणालाच देत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव. साधा स्वतःचा फोटो देणे पण तो नाकारतो. कारण त्याची चर्चा नकोच म्हणून.

हेही वाचा >>>“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

पण गुप्ता हे बंधन सोडून आर्वी मतदारसंघात आले आहे. मोठा आग्रह केल्यावर गुप्ता बोलते झाले. म्हणतात की सुरक्षेच्या कारणास्तव मी कुठे जाणे टाळतो व स्वतःचा परिचय किंवा फोटो पण टाळतो. पण सुमित निवडणुकीत उभे असल्याचे कळले आणि कसलीच चिंता नं करता सुट्टी घेऊन आर्वीत आलो. आता मतदान होईपर्यंत इथेच थांबणार.  कारण काय तर ते सांगतात,  २०१४ ते २०१९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. त्या काळात वर्षां बंगल्यावर सुमित वानखेडे हे नियमित यायचे. ओळख झाली. ती वाढतच गेली. वानखेडे माझ्यासाठी वेळ काढायचे. मी व्यवस्थापक व खानसामा म्हणून बंगल्यावर  असल्याने ते विचारपूस करायचे. अत्यंत सामान्य व्यक्ती म्हणून मला ते आपले वाटू लागले.  म्हणून मी प्रचारास आलो. फोटो घेतल्या जाणार नाही, याची काळजी घेत मदत करतो. आमची काही मंडळी इकडे असतात. त्यांच्याशी चर्चा करतो. मला फारसे काम नाहीच. पण कुणाला काही मदत लागली तर देतो, असे गुप्ता सांगतात.

सध्या मी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडी  कॅन्टीनची जबाबदारी सांभाळत आहे. मतदान झाले की परत मुंबईस जाणार, अशी भावना गुप्ता व्यक्त करतात.

Story img Loader