विवेक रानडे यांची संकल्पना; सोनाली कु लकर्णी, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे मुखपट्टीचे महत्त्व सांगणार

नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेने कित्येकांना आपल्या कवेत घेतले. दुसऱ्या लाटेने अवघे कु टुंब संपवले आणि आता तिसऱ्या लाटेचाही इशारा आलेला आहे. तरीही माणसांमधील बेफिकिरी वृत्ती गेलेली नाही. पावलोपावली त्याचा प्रत्यय येत आहे. एक छोटीशी मुखपट्टी कु णाचा तरी जगण्याचा आधार, कु णाचे तरी छत्र हिरावण्यापासून वाचवू शकते. अशाच एका अनुभवातून नावाजलेले कलावंत विवेक रानडे यांनी या बेफिकिरी वृत्तीचा नायनाट करण्यासाठी जाहिरात मोहीम तयार के ली आहे. या मोहिमेने शहरातीलच नाही तर जगभरातील अशा बेफिकिरी वृत्तीचा नायनाट होईल.

करोनाला नाहीसे करण्यासाठी सर्वच जण काम करत आहेत. यात डॉक्टरांपासून तर स्वयंसेवी अशा सर्वाचाच समावेश आहे. मात्र, एका दिशेने हे काम होत नव्हते. त्यामुळे विवेक रानडे यांनी ‘कॅ लामिटी रिस्पॉन्स ग्रुप’स्थापन के ला. आता करोनाची लाट आली, पुढे आणखी कोणती लाट येऊ शकते. त्यामुळे हा समूह तयार के ल्यानंतर असे लक्षात आले की करोनाची तिसरी लाट आली तर ती फक्त एकाच कारणामुळे येणार आहे. मुखपट्टय़ांचा वापर करणे लोकांनी सोडले किं वा त्याचा नीट वापर के ला नाही तर तिसऱ्या लाटेचा कहर पहिल्या दोन्ही लाटेपेक्षा तीव्र राहील. ते होऊ नये आणि लोकांनी मुखपट्टय़ांचा वापर करावा यासाठी ही जाहिरात मोहीम तयार करण्यात आली. मुखपट्टी लोक घालतात, पण ते केवळ पोलिसांनी पकडू नये म्हणून. मात्र, मुखपट्टी लावावी तर पोलिसांनी पकडू नये म्हणून नाही तर करोनाच्या विळख्यात सापडू नये म्हणून. पुढच्या काळात तरी मुखपट्टी हेच शस्त्र करोनापासून बचावासाठी प्रभावी ठरणार आहे. या जाहिरात मोहिमेला आणखी एका मोहिमेची जोड देण्यात येणार आहे. अभिनेत्री सोनाली कु लकर्णी, सौंदर्या शर्मा, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे एका जाहिरातीच्या माध्यमातून मुखपट्टीचे महत्त्व सांगणार आहेत. मुखपट्टी घाला नाही तर करोना होण्याचे प्रमाण वाढेल. तसे झाले तर रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढेल. एकदा रुग्णालयात भरती झाल्यानंतर जवळ आहे नाही ती सर्वच संपत्ती खर्ची होईल आणि त्यानंतरही घरचे लोक बाधित होतील. मात्र, मुखपट्टी घालाल तरच तुम्ही आणि तुमचे कु टुंब सुरक्षित राहील, असा संदेश हे कलावंत या जाहिरात मोहिमेतून देणार आहेत.

एका नातेवाईकाकडे संपूर्ण कु टुंब करोनाने उद्ध्वस्त झाले. आजी-आजोबा, आई-वडील या चौघांचाही करोनाने बळी घेतला. त्या घरात अवघ्या सहा वर्षांचे मूल जिवंत राहिले. ही बाब मनात खोलवर जखम करून गेली. तेव्हापासूनच या जाहिरात मोहिमेची संकल्पना डोक्यात घोळत होती. ते लहान मूल म्हणते, ‘आई तू का नाही मुखपट्टी लावली गं? माझी काळजी करायला तरी मुखपट्टी घालायला होती’ या संकल्पनेतूनच ही संपूर्ण जाहिरात मोहिमेची संकल्पना प्रत्यक्षात आणली. करोनाला हरवण्यासाठी आपणही काही समाधान दिले पाहिजे यातूनच ही आखणी करण्यात आली आहे.

– विवेक रानडे