जिल्ह्य़ातील करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख पार

२४ तासांत ८९ मृत्यू; ७,४९६ नवीन रुग्ण

Corona test
प्रातिनिधिक छायाचित्र

२४ तासांत ८९ मृत्यू; ७,४९६ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ८९ करोना रुग्णांचा मृत्यू तर ७ हजार ४९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांमुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या ४ लाखाहून पुढे गेली आहे.

शहरात दिवसभरात ४९, ग्रामीणला ३३, जिल्ह्य़ाबाहेरील ७ असे एकूण जिल्ह्य़ात ८९ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ४४१, ग्रामीण १ हजार ८१४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४५ अशी एकूण ४ हजार ३०० रुग्णांवर पोहोचली आहे.  शहरात २४ तासांत ४ हजार ४२२, ग्रामीण ३ हजार ६७, जिल्ह्य़ाबाहेरील ७ असे एकूण ७ हजार ४९६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ९० हजार ६५३, ग्रामीण १ लाख ९ हजार ४४६, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २२७ अशी एकूण ४ लाख १ हजार ३२६ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात १९ हजार १२८, ग्रामीणला ७ हजार ८४  संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले. त्यांचे अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहेत. परंतु बुधवारी चाचणी झालेल्या जिल्ह्य़ातील एकूण २६ हजार ५२५ नमुन्यांत ७ हजार ४९४ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण २८.२५ टक्के नोंदवले गेले.

 

विदर्भातील करोना बळींच्या संख्येने चिंता वाढली!

विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ांत सलग दुसऱ्या दिवशी २८० हून अधिक करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू नोंदवण्यात आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत येथे २८२ रुग्णांचा मृत्यू तर १५ हजार ९३८ नवीन करोनाग्रस्त आढळले. भंडारा जिल्ह्य़ात तब्बल ३४ मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

विदर्भात २८ एप्रिलला २८५ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असतानाच २९ फेब्रुवारीला पुन्हा २८२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी २४ तासांत नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ४९, ग्रामीण ३३, जिल्ह्य़ाबाहेरील ७, असे एकूण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३१.५६ टक्केमृत्यूचा समावेश आहे. तर नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ७ हजार ४९६ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात ३४ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार ११० रुग्ण, अमरावतीत २१ मृत्यू तर ९३४ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २९ मृत्यू तर १ हजार ७४१ रुग्ण, गडचिरोलीत १२ मृत्यू तर ५६१ रुग्ण, गोंदियात १३ मृत्यू तर ५८४ रुग्ण, यवतमाळला ३१ मृत्यू तर ८५५ रुग्ण, वाशीमला ८ मृत्यू तर ५२४ रुग्ण, अकोल्यात १० मृत्यू तर ६७३ रुग्ण, बुलढाण्यात ७ मृत्यू तर ६२० रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात २८ मृत्यू तर ८४० नवीन रुग्ण आढळले.

जिल्ह्य़ात ७७ हजार  उपचाराधीन रुग्ण

शहरात ४६ हजार १५०, ग्रामीणला ३१ हजार ४७७ असे एकूण जिल्ह्य़ात ७७ हजार ६२७ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील ६८ हजार ३८१ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ९ हजार २४६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

करोनामुक्तांचे प्रमाण ७९.१० टक्क्यांवर

शहरात दिवसभरात ४ हजार ५७६, ग्रामीणला २ हजार ४०८ असे एकूण ६ हजार ९८४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ३९ हजार ७७१, ग्रामीण ७६ हजार ६२८ अशी एकूण ३ लाख १६ हजार ३९९ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ७९.१० टक्के आहे.

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४२८६१

फ्रंट लाईन वर्कर      – ४५४२८

४५ अधिक  वयोगट    –  ९८१५९

४५ अधिक कोमार्बिड     – ७४४९०

६० अधिक सर्व नागरिक – १,५८,६१९

एकूण  –      ४,१९, ५५७

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक           – १९६८३

फ्रंट लाईन वर्कर       –  ११९९७

४५ अधिक वयोगट      –  ९१४३

४५ अधिक कोमार्बिड    –   ८५०८

६० अधिक सर्व नागरिक   –  ३८२८४

एकूण –    ८७,६१५

संपूर्ण लसीकरण एकूण – ५,०७,१७२

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona cases in nagpur district crossed 4 lakh mark zws

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या