नागपूर : सार्वजिनक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सव्‍‌र्हेक्षण कार्यक्रम अहवालानुसार, महाराष्ट्रात जानेवारी २०२२ मध्ये करोनाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ०.१० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण फेब्रुवारी- २०२२ मध्ये ०.७० टक्के आहे.

राज्यात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान करोनाचे १० लाख ३३ हजार ११८ रुग्ण आढळले.  या काळात १,०७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ०.१० टक्के नोंदवले गेले. ३१ जानेवारीला राज्यात सक्रिय रुग्णसंख्या २ लाख ७ हजार ३५० होती.  राज्यात १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान करोनाचे १ लाख १९ हजार ८७८ रुग्ण आढळले.  या काळात ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ०.७० टक्के नोंदवले गेले. दरम्यान, करोना नियंत्रणात येत असल्याने १८ फेब्रुवारीला राज्यात सक्रिय रुग्णसंख्या  २१ हजार १५९ रुग्ण इतकी खाली आली.  राज्यात मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत करोनाचे ६६ लाख ७८ हजार ८२१ रुग्ण आढळले होते. यापैकी उपचारादरम्यान १ लाख ४१ हजार ५२६ रुग्ण दगावले. त्यामुळे यावेळी मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के नोंदवले गेले होते. त्यामुळे पहिल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत करोनाचा मृत्युदर खूपच कमी आहे.

Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
दत्ता जाधव possibility of light rain across maharashtra for four days from 5 april
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर