जिल्ह्यात दुसऱ्यांदा शून्य रुग्णाची नोंद !

शहरात ३०, ग्रामीणला ४ अशा एकूण ३४ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले.

corona updates

२४ तासांत २,८२९ संशयितांच्या चाचण्या

नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यात दुसऱ्यांदा २४ तासांत शून्य रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिलाला आहे. तर दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ३५८, ग्रामीण १ लाख ४६ हजार १९२, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ८८४ अशी एकूण ४ लाख ९३ हजार ४३४ रुग्ण इतकी होती. तर दिवसभरात एकही मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५ हजार ८९३, ग्रामीण २ हजार ६०४, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६२४ अशी एकूण १० हजार १२१ रुग्ण इतकी होती. दरम्यान, दिवसभरात शहरात २ हजार ९५, ग्रामीणला ७३४ अशा एकूण २ हजार ८२९ संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले. तर गुरुवारी शहरात ३०, ग्रामीणला ४ अशा एकूण ३४ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले.

करोनामुक्तांचे प्रमाण ९७.९४ टक्के

दिवसभरात शहरात २, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण ३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ४३५, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५८४, जिल्ह्याबाहेरील ५ हजार २६० अशी एकूण ४ लाख ८३ हजार २७९ व्यक्ती होती. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत हे करोनामुक्तांचे प्रमाण ९७.९४ टक्के होते.

विदर्भात ६ रुग्णांची भर

विदर्भात २४ तासांत एकही मृत्यू नसून नवीन ६ रुग्णांची भर पडली. नवीन रुग्णांत चंद्रपूर २, यवतमाळ ३, बुलढाणातील १ रुग्णांचा समावेश होता. तर नागपूर, अमरावती, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशीम, अकोला, वर्धा या आठ जिल्ह्यांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona death akp 9

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या