पाच दिवसांनी नवीन रुग्णसंख्या दोन आकडी

२४ तासांत मृत्यू नाही; १२ रुग्णांची भर

Coronavirus in India
आजपर्यंत देशात ४,२७,८६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्य झालेला आहे. (संग्रहीत छायाचित्र)

२४ तासांत मृत्यू नाही; १२ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात रविवारपासून सलग पाच दिवस नवीन करोनाग्रस्तांची संख्या एक आकडी येत होती. परंतु गुरुवारी दिवसभरात १२ नवीन रुग्णांची भर पडली. एकही मृत्यू नोंदवला गेला नाही.

३१ जुलैला दिवसभरात २४ नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र १ ते ४ ऑगस्ट दरम्यान एक आकडी म्हणजे ३ ते ९ दरम्यान रुग्ण आढळले. परंतु गुरुवारी  १२ रुग्ण आढळले. त्यात शहरातील ५, ग्रामीणच्या ६, जिल्ह्य़ाबाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ३ लाख ४० हजार १, ग्रामीण १ लाख ४६ हजार १११, जिल्ह्य़ाबाहेरील ६ हजार ८०६ अशी एकूण ४ लाख ९२ हजार ९१८ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५ हजार ८९२, ग्रामीण २ हजार ६०३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ६२२ अशी एकूण १० हजार ११७ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात २, ग्रामीणला २ असे एकूण ४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३३ हजार ९५१, ग्रामीण १ लाख ४३ हजार ४७३, जिल्ह्य़ाबाहेरील ५ हजार १८१ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ६०५ व्यक्तींवर पोहोचली आहे.

विदर्भात एक मृत्यू; ३९ रुग्ण 

विदर्भातील दहा जिल्ह्य़ात करोनाचा एकही मृत्यू झाला नाही. चंद्रपूर या एकाच जिल्ह्य़ात एका रुग्णाचा मृत्यू नोंदवला गेला. विदर्भात दिवसभरात ३९ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील अकराही जिल्ह्य़ातील  नवीन करोनाग्रस्तांची संख्या कमी असल्याने आजार नियंत्रणात दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी २४ तासांत नागपुरात १२ रुग्ण, अमरावतीत ३ रुग्ण, चंद्रपूरला ४ रुग्ण, गडचिरोलीत ६ रुग्ण, भंडाऱ्यात १ रुग्ण, वाशीमला २ रुग्ण, अकोल्यात ३, बुलढाण्यात ८ रुग्ण आढळले. परंतु वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्य़ांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

पहिली लसमात्रा घेणाऱ्यांची संख्या १० लाख पार

शहरात १६ जानेवारीला  करोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सुयोग्य नियोजनामुळे आणि व्यापक जनजागृतीमुळे साडेपाच महिन्यातच शहरात लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांचा आकडा दहा लाख आज पार गेला आहे. यातील चार लाखांवर नागरिकांनी दुसरी मात्राही घेतली आहे. प्रारंभी महापालिका व शासकीय मिळून केवळ चार केंद्रांवर लसीकरण सुरू होते. आज १५० पेक्षा अधिक केंद्रांवरून लस दिली जात आहे. आता तर पहिली मात्रा घेणाऱ्यांनी १० लाखांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ४६,५८४ आरोग्य कर्मचारी, ५३,३४९० फ्रंटलाईन वर्कर, १८  ते ४४ वर्षे वयोगटातील ४०,९१९८, ४५ ते ६० वर्षे वयोगटातील २९,४०९२, ६० वर्षांवरील २०,३६१३ अशा एकूण १०,०६९७७ व्यक्तींचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus in nagpur nagpur city recorded 12 new covid cases in last 24 hours zws