scorecardresearch

MLC Election : अमरावती पदवीधर मतदार संघात बाद फेरीची मतमोजणी सुरूच; निकालास विलंब, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

MLC election update maharashtra 2023 महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे २ हजार ३६२ मतांनी आघाडीवर

dheeraj lingade
अमरावती पदवीधर मतदार संघ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमरावती : Maharashtra mlc election result 2023 विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात झालेल्‍या निवडणुकीची मतमोजणी सुरूच असून बाद फेरीच्‍या मतगणनेत आतापर्यंत एकूण २३ उमेदवारांपैकी १२ उमेदवार बाद ठरल्‍यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ६१४ तर भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २४८ मते प्राप्‍त झाली आहेत. धीरज लिंगाडे हे सध्‍या २ हजार ३६२ मतांनी आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्‍या चोवीस तासांच्‍या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्‍या. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती.

हेही वाचा >>> MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?

वैध मतांची संख्‍या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्‍याने विजयासाठी आवश्‍यक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधीने अवैध ठरलेल्‍या ८ हजार ७३५ मतांचे फेरअवलोकन करण्‍याची मागणी केली. ही मागणी मान्‍य करण्‍यात आली. त्‍यानुसार रात्री उशिरा या मतपत्रिकांची पडताळणी सुरू करण्‍यात आली.

हेही वाचा >>> MLC Election Result : गाणार यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंचे धक्कादायक विधान म्हणाले, “गाणार हे भाजपचे…”

पडताळणीनंतरही डॉ. रणजित पाटील यांच्‍या मतांमध्‍ये फारसा फरक पडला नाही. यात लिंगाडे आणि डॉ. पाटील यांच्‍या मतांमध्‍ये किंचित वाढ झाली आणि लिंगाडे यांची आघाडी ही २ हजार ३४६ मतांवर पोहचली. यातही डॉ. पाटील यांचे नुकसानच झाले, पण मतांचा कोटा हा ४७ हजार १०१ मतांवर पोहचला. पडताळणीअखेर वैध मतांची संख्‍या ही ९४ हजार २२० तर अवैध मतांची संख्‍या ८ हजार ३८७ इतकी होती. रात्री १ वाजताच्‍या सुमारास बाद फेरीची मतमोजणी हाती घेण्‍यात आली. मतमोजणीला चोवीस तासांहून अधिक कालावधी उलटून गेल्‍यानंतरही अंतिम निकाल लागलेला नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 09:11 IST