scorecardresearch

नागपूर : २२ उमेदवार, २८ टेबल, प्रत्येक टेबलवर हजार मतपत्रिका; ‘शिक्षक’ची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजतापासून

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंंघातील निवडणूक निकालाची उत्सुकता वाढली असून, गुरुवारी २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

nagpur Teacher constituency election
नागपूर शिक्षक मतदारसंघ मतमोजणी (image – loksatta team/graphics)

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंंघातील निवडणूक निकालाची उत्सुकता वाढली असून, गुरुवारी २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अजनीतील सामुदायिक भवनात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २८ टेबलवर मतमोजणी होणार आहे. स्ट्राँगरूममधून बाहेर काढण्यात आलेल्या मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करण्यात येतील व त्यांनतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात होईल. यावेळी उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – आमदाराने मध्यरात्री छापा टाकत उघडकीस आणली वाळू तस्करी, वाचा कधी आणि कुठे ते…

हेही वाचा – केसीआर यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, ‘बीआरएस’ गडचिरोलीतून लढणार विधानसभा; माजी आमदार लागले गळाला

२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात येईल. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वा. सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपणीयतेची  शपथ  देतील. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान  झाले. या निवडणुकीत गाणार, अडबाले व झाडे यांच्यात लढत आहे व त्यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 15:03 IST
ताज्या बातम्या