scorecardresearch

बुलढाणा : लहान बाळासह वाहनात बसून दाम्पत्याचे उपोषण

संगणक परिचालकपदी नियुक्ती मिळत नाही व तक्रारीची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवला आहे.

बुलढाणा : लहान बाळासह वाहनात बसून दाम्पत्याचे उपोषण

संगणक परिचालक नियुक्तीमध्ये करण्यात आलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ एका दाम्पत्याने जिल्हा परिषद समोर लहान बाळासह वाहनात बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नीलेश तायडे व अस्मिता तायडे असे या दाम्पत्याचे नाव आहे. ११ महिन्यांच्या बाळासह त्यांनी महेंद्र पिकअप या वाहनात उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा >>> पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करूनही पत्नी गर्भवती ; पतीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार

संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बुद्रूक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक पदभरतीत शैक्षणिक पात्रता असूनही नियुक्ती करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेसमोर २६ सप्टेंबरपासून उपोषणास सुरुवात केली. तीन दिवस उलटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नाही. दरम्यान, संगणक परिचालकपदी नियुक्ती मिळत नाही व तक्रारीची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या