लोकसत्ता टीम

चंद्रपूर : मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे (६९) वनपरिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक ४३१ मध्ये गुरे चराईसाठी गेले असता जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले.

ही माहिती शुक्रवारी रात्री उशीरा मिळाल्याने व गुराखी घरी न आल्यामुळे शनिवारी सकाळी वनविभागाने शोध मोहीम राबवली. त्यानंतर जंगलात गुराख्याचा मृतदेह मिळाला. वनविभाग व पोलीस प्रशासनामार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

आणखी वाचा-नागपूर : आंदोलक आक्रमक! विधान भवनात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा…

मृतक गुराखी लक्ष्मण मराठे याच्या पत्नीला वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर. वेलमे, चिचपल्ली (प्रादेशिक) यांचे हस्ते ३० हजार रुपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली. यावेळी पि.डब्लू. पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी. खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी उपस्थित होते.