scorecardresearch

नागपूरकरांवर क्रिकेटचा ‘फिव्हर’, ३ हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात

जामठ्यात गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नागपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.

police

जामठ्यात गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नागपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. जवळपास ३ हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच क्रिकेट सामना बघायला गर्दी उसळणार असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि वाहतूक उपायुक्तांनी जामठा मैदानाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

हेही वाचा >>>राष्ट्रीय महामार्ग सहावरील उपशमन योजना १५ वर्षांपासून प्रलंबित, वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ क्रिकेट एसोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ चार दिवसांपूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. खेळाडूंची आणि मैदानावरील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सशस्त्र जवानाच्या तुकड्यांसह साध्या वेशातील पोलिसांचा ताफासुद्धा सज्ज आहे. वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवाहू वाहनांना सामन्याच्या वेळेत तात्पुरती प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पाच दिवस वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल होणार आहे. हैदराबाद-वर्धा मार्गावरील जड वाहतूक डोंगरगाव टोल नाका येथे थांबवण्यात येत आहे. कामठी, भंडारा रोडवरील वाहतूक पांजरी टोल नाक्यावर तर अमरावती रोडवरून येणारी वाहतूक नॅशनल कॅन्सर इन्ट्यिट्यूट फाट्यावर थांबवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 09:23 IST
ताज्या बातम्या