scorecardresearch

खबरदार… नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरूद्ध जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले असून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

खबरदार… नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरूद्ध जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले असून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.जिल्ह्यात महानगरपालीका क्षेत्रात झोननिहाय तसेच  नगरपालीका क्षेत्र व ग्रामीण भागात देखील समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी संबंधीत पोलीस ठाणेदार यांच्या समवेत नायलॉन मांजा विक्री होत असलेल्या तसेच नॉयलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरूद्ध तत्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

हेही वाचा >>>नागपूर: अपात्र ठरवल्याचा निर्णय मागे घेण्याची कुलगुरूंवर नामुष्की; राजीनाम्याच्या मागणीला पुन्हा जोर

नायलॉन मांजाच्या वापराविरूद्ध कारवाईचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृह येथे आज बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, महानगरपातिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी (माध्यमीक) रवींद्र काटोलकर, नगरपालीका प्रशासन अधिकारी अतुल पंत तसेच इरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>नागपूर: नायलॉन मांजाविरुद्ध कठोर कारवाई कागदावरच; यंत्रणेच्या नाकावर टिच्चून मांजाविक्री सुरूच

 जिल्हाधिकारी यांनी परराज्यातून येणाऱ्या नायलॉन मांजावर आळा घालण्यासाठी पोलिस चेकपास्ट ॲक्टीव्ह करण्याचे तसेच  सायबर सेलने ऑनलाईन मांजा विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भागात पतंग जास्त प्रमाणात उडविल्या जाते, अशा भागात विशेक्ष लक्ष ठेवण्याचे तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी नायलॉन मांजाविरोधात सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर: शासनाकडून वीज कामगार संघटनांची फसवणूक?

‘मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा सर्व शासकीय व खाजगी शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मकरसंक्रातपर्यंत रोज घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबत पालकांनो, आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे व नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते, अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पालकांना केले आहे.

तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
नायलॉन मांजा बाबत तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. नागरिकांना 0712-2562668 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 यावर तसेच जवळच्या महानगरपालिका झोन कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपिरषद, नगरपंचायत, पंचायत समिती कार्यालय येथे देखील नायलॉन मांजाबाबत तक्रारी दाखल करता येतील.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या