scorecardresearch

Premium

“महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचं जंगलराज, झेपत नसेल तर सत्ता सोडा”, कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून नाना पटोले कडाडले

राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

Nana Patole law and order
"महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचं जंगलराज, झेपत नसेल तर सत्ता सोडा", कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून नाना पटोले कडाडले (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात दररोज हत्या, बलात्कार, दंगली घडत आहेत. विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठाच्या रँकिंगबद्दल काय म्हणाले? केल्या ‘या’ सूचना

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

पटोले म्हणाले, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? राज्याला गृहमंत्री आहेत का? असे प्रश्न पडावेत इतकी भयावह अवस्था आहे. राज्याच्या विविध भागांतून दररोज खून, बलात्कार, दरोडे, दंगली, विरोधकांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा शहरांमध्ये दंगली झाल्या. दररोज वेगवेगळ्या शहरांत तणावाच्या घटना घडत आहेत. सत्ताधारी पक्षांकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केले जात असून, जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पहात बसले आहेत. गुंड आणि समाजकंटक दररोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत, असा संतापही पटोलेंनी व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criticism of nana patole over law and order in maharashtra said shinde fadnavis jungle raj in maharashtra rbt 74 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×