scorecardresearch

Premium

१३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद

देसाईगंज वनपरिक्षेत्रातील वळूमाता जंगल परिसरात वन विभाग आणि विशेष पथकाने ही कामगिरी पार पाडली.

CT 1 tiger finally arrested 13 persons kill Gadchiroli Chandrapur and Bhandara
१३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा 'टायगर' अखेर जेरबंद

गडचिरोली : चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले. गुरुवारी सकाळ आठ वाजताच्या सुमारास देसाईगंज वनपरिक्षेत्रातील वळूमाता जंगल परिसरात वन विभाग आणि विशेष पथकाने ही कामगिरी पार पाडली.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

१३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील विशेष पथक गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्नरत होते. वळूमाता प्रक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी या वाघाने गायीला ठार केले होते. त्यामुळे तो पुन्हा या ठिकाणी येणार याची खात्री असल्याने रात्रीच वनविभागाने विशेष पथकाला या ठिकाणी पाचारण केले होते.

हेही वाचा : नागपूर : उच्चवर्णीय ललित लेखक सावरकरप्रेमी व गांधीविरोधी -प्रा. सुरेश द्वादशीवार

त्याठिकाणी वाघासाठी शिकार म्हणून गायदेखील ठेवण्यात आली होती. अखेर पहाटेच्या सुमारास सीटी १ वाघ जाळ्यात अडकला. टप्प्यात येताच शुटरने त्याच्यावर डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन) डागला. या वाघाला आता पिंजऱ्यात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 10:51 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×