CTET Exam 2026: वर्धा : शिक्षक होण्यासाठी आता राज्य व केंद्र पातळीवार पात्रता परीक्षा घेणे सूरू झाले आहे. कठोर चाचणी आणि त्यात पात्र ठरलेलेच आता शिक्षक होवू शकतील. शिक्षण अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले, असे म्हटल्या जाते. दरवर्षी ही पात्रता परीक्षा घेतल्या जात असते. त्यात लाखो ईच्छुक सहभागी होत असतात.
परीक्षा दिनांक
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) २२ व्या आवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२६ (रविवार) रोजी देशभरात आयोजित केली जाणार असून यामध्ये पेपर-१ आणि पेपर-२ चा समावेश असेल. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ मे २०२६ पासून सुरू होणार आहे.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाहीर झाल्यात
सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना १० जून २०२६ रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. अर्जाचे शुल्क भरण्यासाठी देखील हीच अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सुधारणा
अर्जामध्ये काही चुका झाल्यास त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना १५ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत ‘ऑनलाइन करेक्शन’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जात बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.परीक्षा केंद्र निवडीबाबत नवीन नियम आहेत.
महत्वाचे वैशिष्ट्य
यावेळच्या परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना स्वतःचे परीक्षा शहर निवडण्याची मुभा नसेल. ऑनलाईन पोर्टलवर परीक्षा शहर निवडण्याचा कोणताही प्रावधान देण्यात आलेला नाही. सर्व उमेदवारांना रँडम पद्धतीने (Random Basis) सीबीएसईद्वारे परीक्षा शहर दिले जाईल. एकदा मिळालेले केंद्र बदलण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेचे स्वरूप आणि निकाल असे लागणार
ही परीक्षा एकूण २७ भाषांमध्ये घेतली जाईल. देशभरातील १३२ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील.
केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज
निकाल परीक्षेचा निकाल अक्टूबर २०२६ च्या अखेरीस तात्पुरत्या स्वरूपात (Tentatively) जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
विशेष सूचना अशी की…
जर परीक्षार्थींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, तर मुख्य परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२६ (शनिवार) रोजी देखील परीक्षा घेतली जाऊ शकते. उमेदवारांनी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, पात्रता निकष आणि इतर माहितीसाठी https://ctet.nic.in किंवा https://www.cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणारे माहिती बुलेटिन डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज भरायचे आहेत.
