नागपूर: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ७ जुलै २०२६ रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच सीटीईटी जुलै सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी करेल. प्रवेशपत्रे जारी झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत सीटीईटी वेबसाइट ctet.nic.in ला भेट देऊन ती डाउनलोड करू शकतील. सीटीईटी अर्जदार सध्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत, परंतु जे कोणत्याही कारणास्तव पूर्णपणे तयारी करू शकले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, आता सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसमोर मोठी अडचण आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे.

या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.

निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील. १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती या साठी मतदान ५ फेब्रुवारीला होणार होते. पण आत्ता मतदान ७ फेब्रुवारीला होणार आहे. त्याचं दिवशी केंद्रीय शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षा देखील आहे. तरी सरकारने ७ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलून विध्यार्थ्यांना आपल्या हक्का बजावण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली.  मी स्वप्नील कदम मूळचा पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील विद्यार्थी आहे. त्याने सांगितले की त्याचा पेपर आणि परीक्षा एकाच दिवशी येणार आहे. असे हजारो विद्यार्थी असून त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.