अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके खरेदीची लगबग वाढली आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांनी आता पुस्तके विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले असून पुस्तविक्री करणाऱ्या राज्यातील नामांकित दुकांनाच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून आर्थिक फसवणूक केली जात आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

अनेक पुस्तकालयात पुस्तके उपलब्ध नसल्याने पालक-विद्यार्थी ऑनलाइन पुस्तके खरेदी करतात. त्याचाच हे सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत आहेत. राज्यातील जवळपास २ हजार ६०० पेक्षा जास्त जणांची ऑनलाइन पुस्तक खरेदी करताना फसवणूक झाली असून महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

कशी होते फसवणूक?

ऑनलाइन खरेदी करताना पुस्तके उपलब्ध असलेल्या दुकानांची यादी इंटरनेटवर शोधली जात असताना हवी असलेली पुस्तके बनावट संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचा दावा सायबर गुन्हेगार करतात. पुस्तकाच्या १० टक्के रक्कम भरण्यास सांगितले जाते. त्यासाठी ‘क्युआर कोड’ पाठविण्यात येतो. तो कोड स्कॅन केला की काही कळायच्या आत खात्यातून मोठी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळती होते.

पोलीस अधिकाऱ्यालाही फटका

सायबर गुन्हेगारांनी अनेक उच्चशिक्षितांची अशीच फसवणूक केली. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हे सायबर गुन्हेगार पुस्तक विक्रेत्यांच्या नावाने स्वत:चे दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर देतात. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर लगेच पैसे पाठविण्यासाठी लिंक किंवा क्युआर कोड पाठवून फसवणूक होते.

अनोळखी अथवा संशयित वाटणाऱ्या लिंकला क्लिक करू नका. अज्ञात ठिकाणाहून येणारा क्युआर कोड पाठविल्यानंतर तो स्कॅन करू नका. फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करा. – सुकेशिनी लोखंडे, पोलीस अधिकारी, सायबर क्राईम.