नागपूर : एखाद्या अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिका पाठवल्यानंतर उत्सुकतेपोटी किंवा एखाद्या नातेवाईकाचे लग्न असल्याचे वाटून ती पत्रिका उघडण्यात येते. लग्नपत्रिकेच्या नावाने ‘एपीके फाइल’ डाऊनलोड होते. मात्र, काही क्षणातच भ्रमणध्वनीचे नियंत्रण दुसऱ्याकडे गेल्याचे लक्षात येते. हा प्रकार सायबर गुन्हेगारांचा नवा सायबर घोटाळा आहे. आतापर्यंत राज्यभरातून अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी समोर आल्या आहेत.

सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करतात. पूर्वी बँकेतून बोलतोय किंवा तुमचे बँक खाते बंद होत असल्याची भीती घालून सायबर गुन्हेगार एटीएम कार्डचा पासवर्ड मिळून फसवणूक करीत होते. त्याबद्दल सतर्कता वाढल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी नवीन प्रकार सुरू केला आहे. अनेकांच्या भ्रमणध्वनीमध्ये ‘लग्नपत्रिका डॉट एपीके’ नावाने एक चित्रफीत येते. अनोळखी क्रमांकावरून ही चित्रफीत आली तरी अनेक जण ती डाऊनलोड करतात.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील

त्यानंतर काही वेळातच भ्रमणध्वनी आपोआप बंद पडतो. पुन्हा सुरू केल्यानंतर काही सेटिंग बदललेली दिसते. सायबर गुन्हेगार ‘एपीके फाइल’च्या माध्यमातून छुप्या पद्धतीने भ्रमणध्वनीवर नियंत्रण मिळवतात. त्यानंतर भ्रमणध्वनीमधील संदेश, क्रमांक, छायाचित्र, चित्रफिती, बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट अॅप यासोबतच व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे नियंत्रण सायबर गुन्हेगार स्वत:कडे करून घेतात. भ्रमणध्वनीमध्ये ठेवलेले आधारकार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रांचाही गैरवापर करण्यात येतो.

भ्रमणध्वनीचा ताबा मिळवून फसवणूक

सायबर गुन्हेगार सर्वाधिक वेळा पेटीएम, गुगल पे व अन्य पेमेंट अॅपचा वापर करून काही वस्तू ऑनलाइन खरेदी करतात. त्या वस्तूंचे शुल्क जाळ्यात अडकलेल्या ग्राहकाच्या पेमेंट अॅपमधून करण्यात येते. तसेच बँक खात्यातून पैसे काढून सायबर गुन्हेगार स्वत:च्या खात्यात वळते करतात.

‘एपीके’ (अँड्रॉईड पॅकेजिंग किट) स्वरूपाच्या फाइल डाऊनलोड करू नका. कारण अशा फाइलमधून सायबर गुन्हेगार तुमच्या भ्रमणध्वनीवर नियंत्रण मिळवू शकतात. या नव्या फसवणुकीच्या प्रकारापासून सावध राहावे. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर फोन करावा किंवा पोलीस ठाण्यात तक्रार करावी. अमित डोळसपोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे

Story img Loader