scorecardresearch

नागपुरात बॅगमध्ये सापडला मृतदेह; मुलगी आणि जावयावर संशय

सुटकेसमध्ये खूप वजन असल्यामुळे ती हाताळण्यास जोडप्याला खूप अवघड जात होते.

नागपुरात बॅगमध्ये सापडला मृतदेह; मुलगी आणि जावयावर संशय
Fire in Pune ATM : तुळशीबागवाले कॉलनीमधील जनता सहकारी बँकेच्या ATM मध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

नागपुरच्या माटे चौक एका बॅगेत व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काल (रविवारी) रात्री एका रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनामुळे हा प्रकार उघडकीस आला. काही वेळापूर्वीच पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्तीचे नाव शिवसिंग मान (वय ४५) असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसिंग मान यांचे माटे चौक परिसरात सायकल रिपेरिंगचे दुकान होते. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याचीही माहिती तपासात पुढे आली आहे.

काल रात्री तीन वाजता येथील दुर्गा नगर परिसरात एका जोडप्याने रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रिक्षाचालकाला बोलावून घेतले. त्यावेळी या दोघांकडे एक मोठी सुटकेस होती. या सुटकेसमध्ये खूप वजन असल्यामुळे ती हाताळण्यास जोडप्याला खूप अवघड जात होते. त्यावेळीच रिक्षाचालकाला जोडप्याच्या संशयास्पद हालचाली पाहून काहीतरी गैरप्रकार असल्याची कुणकुण लागली. त्यानंतर या जोडप्याला घेऊन रिक्षाचालक स्टेशनच्या दिशेने जात होता. मात्र, रिक्षा माटे चौक परिसरात आली असताना त्याला बॅगेतून वास येऊ लागला. त्यामुळे रिक्षाचालकाने या जोडप्याकडे त्यासंबंधी विचारणा केली. तेव्हा हे जोडपे तेथून घाबरून पळून गेले. यानंतर रिक्षाचालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅगेची तपासणी केल्यावर त्यामध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि आज सकाळी हा मृतदेह शिवसिंग मान यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, त्यांचा मृतदेह बॅगेतून घेऊन जाणारे जोडपे शिवसिंग मान यांची मुलगी आणि जावई असल्याचा संशय आहे. पोलिसांनी नागपूरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहे. मानसिंग यांची मुलगी आणि जावई बेपत्ता असून परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार त्या दोघांनीच ही हत्या केल्याचा दाट संशय आहे. हत्या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्यांच्या समावेशाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ती सूटकेस काल संध्याकाळीच खरेदी करण्यात आली होती. सध्या पोलिसांकडून मानसिंग यांची मुलगी आणि जावयाचा शोध सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-10-2017 at 11:31 IST

संबंधित बातम्या