Dead body of leopard found in Melghat amravati | Loksatta

अमरावती : मेळघाटात आढळला बिबट्याचा मृतदेह; मृत्यूचे कारण…

शवविच्‍छेदनानंतर बिबट्यावर अग्निसंस्‍कार करण्‍यात आले. हा शिकारीचा प्रकार नसल्‍याची शक्‍यता वनविभागातील अधिकाऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे.

अमरावती : मेळघाटात आढळला बिबट्याचा मृतदेह; मृत्यूचे कारण…
(संग्रहित छायाचित्र)

मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पातील सेमाडोह जंगल सफारी मार्गावर वनखंड क्रमांक १६९ मध्‍ये एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. या नर बिबट्याचे वय पाच वर्षांचे होते. बिबट्याच्‍या मृत्‍यूचे कारण लगेच कळू शकले नसले, तरी हा शिकारीचा प्रकार नसल्‍याची शक्‍यता वनविभागातील अधिकाऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचा- रानटी हत्तींचे ‘अपडाऊन’ सुरूच: भंडारा जिल्ह्यातून पुन्हा गोंदियात परतले; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सेमाडोह जंगल सफारी मार्गावर वनपाल बाबुराव खैरकर हे मंगळवारी सकाळी ९ वाजताच्‍या सुमारास गस्‍तीवर असताना त्‍यांना वनखंड क्रमांक १६९ मध्‍ये एक बिबट्या मृतावस्‍थेत दिसून आला. त्‍यांनी लगेच या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम आणि उपवनसंरक्षक दिव्‍या भारती यांना दिली. वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्‍थळी पोहचले. त्‍यानंतर पंचनामा करण्‍यात आला. शवविच्‍छेदनानंतर बिबट्यावर अग्निसंस्‍कार करण्‍यात आले. या बिबट्याचा मृत्‍यू सर्पदंशामुळे झाल्‍याची शक्‍यता वन अधिकाऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:23 IST
Next Story
एकाच ठिकाणी रस्ता, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो; देशातील पहिल्या बहुस्तरीय वाहतूक सुविधेचे पंतप्रधान करणार नागपूरमध्ये लोकार्पण