दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की...| Death of four tiger cubs in Tadoba, fear of male tiger attack | Loksatta

दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…

चारही मृत शावक सहा ते सात महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…
दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी १ डिसेंबर रोजी ताडोबा बफर झोनमध्ये एक वाघीण व एक मादी शावक मृतावस्थेत मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा… अहो… ऐकलं का? चक्क शासकीय कार्यालयात माकडाचा दफनविधी आणि श्राद्ध!

ताडोबा प्रकल्पातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वनाधिकारी गस्तीवर असताना वाघिणीचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती ताडोबा प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. यापूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रातील वासेरा नियतक्षेत्रात ‘टी-७५’ या वाघिणीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी जंगलातील कक्ष क्रमांक १८९ मध्ये ‘टी-६०’ या वाघिणीचा मादी शावक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. चारही मृत शावक सहा ते सात महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… पंतप्रधानांचा नागपूर दौरा, विद्यापीठ निवडणूक पुढे ढकलणार?

मोठ्या वाघाने या चार शावकांवर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. ताडोबा व्यवस्थापनाने मृत्यूचे अधिकृत कारण सांगितलेले नाही. हा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत शवकांची उत्तरीय तपासणी केल्यानंतरच अधिकृत कारण समोर येईल, असे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:13 IST
Next Story
अहो… ऐकलं का? चक्क शासकीय कार्यालयात माकडाचा दफनविधी आणि श्राद्ध!