scorecardresearch

ताडोबा बफर झोनमध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृत्यू, वन खात्यात खळबळ

मामलाच्या जंगलात एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. साधारणतः आठ ते दहा दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

Death of tiger Tadoba
ताडोबा बफर झोनमध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या मामलाच्या जंगलात एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. साधारणतः आठ ते दहा दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात दोन महिन्यांत सात वाघांचा मृत्यू झाला आहे. ताडोबा बफरअंतर्गत वन कर्मचारी गस्तीवर असताना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वाघाचा मृतदेह मिळाला. या घटनेची माहिती ताडोबा बाफरचे उपवन संरक्षक पाठक यांना देण्यात आली. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला आहे. आज शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण सांगता येईल, असे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले.

हेही वाचा – खळबळजनक! सुनेच्या प्रियकराचा सासूवर बलात्कार

हेही वाचा – होली है! ‘चिनी पिचकारी’सह नैसर्गिक रंगाला मागणी

काही दिवसांपूर्वी मामलाच्या जंगलात दोन वाघांत झुंज झाली होती. याच झुंजीत जखमी झालेल्या वाघाचा तर मृत्यू झाला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर मृत्यू झालेला वाघ ताडोबातील प्रसिद्ध मटकासूर वाघ तर नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 10:08 IST