scorecardresearch

बुलढाणा : याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून आ. संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप; संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Yakub Memon Grave : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे अलीकडच्या काळातील सर्वात लज्जास्पद बाब आहे.

MLA-Sanjay-gaikwad
(संग्रहीत छायाचित्र)

बुलढाणा : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे अलीकडच्या काळातील सर्वात लज्जास्पद बाब आहे. यावरून विरोधी पक्ष दहशतवादाचे समर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे, असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

स्थानिक पत्रकार भवनात माध्यमांशी बोलताना आ. गायकवाड यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. अमेरिकेने लादेनचा खात्मा केला, त्याची कबर समुद्रात आहे. अफजल गुरुला कारागृहाताच दफन करण्यात आले. यामुळे मेननच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे अतीच झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे सहन केले नसते. आम्ही ४० आमदारांनी शिवसेना का सोडली, याचे हे देखील एक कारण आहे.  विरोधी पक्ष दहशतवादाचे समर्थक असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. ही सजावट करणाऱ्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2022 at 15:25 IST

संबंधित बातम्या