नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर नागपूरसह देशात प्रथम सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु त्यानंतर कधी दर वाढले तर कधी कमी होत आहेत. मध्यंतरी सातत्याने सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजाराहून जास्त होते. परंतु शनिवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक बहीणींचा आनंद द्विगुनीत झाला.

नागपुरसह राज्यात श्रीकृष्ण जयंतीला सोने- चांदीचे दर वाढल्याने या धातुच्या मुर्ती व दागीने खरेदीसाठी इच्छुकांकडून नाराजी व्यक्त होत होती. परंतु त्यानंतर आता पून्हा नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७२ हजार रुपयाहून खाली आले आहे. नागपुरातील सराफा बाजारात ३० ऑगस्टच्या रात्री २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति प्रति दहा ग्राम ७२ हजार ३०० रुपये होते. हे दर ३१ ऑगस्टला शनिवारी बाजार उघडल्यावर प्रथम ७१ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. त्यानंतर दुपारी १२ वाजता हे दर ७१ हजार ९०० रुपये होते.

हेही वाचा >>>भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल, दिवंगत भावाच्या पत्नीची पोलिसात तक्रार

नागपुरात शनिवारी (३१ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर प्लॅटिनमचा दर ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम होता. हा दर जन्माष्टमीच्या दिवशी २६ ऑगस्टला २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७२ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ८०० रुपये होते. तर प्लॅटिनमचे दर मात्र या दिवशीही ४३ हजार रुपये प्रति दहा ग्राम होते. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टीमीच्या दिवशीच्या तुलनेत नागपुरात शनिवारी दरात किंचित घसरन झाली आहे. त्यातच आजही वाढदिवस, बारसे, लग्नसमारंभासह इतर कामासाठी बरेच नागरिक सोने- चांदीचे दागिनेसह इतरही भेटवस्तू देत असतात. खरेदीसाठी येणाऱ्यांत महिलांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे दर कमी झाल्याचा आनंद बहीणींना जास्त होणार आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

चांदीच्या दरातही घसरण

नागपुरातील सराफा बाजारात ३१ ऑगस्टला दुपारी १ वाजता चांदीचे दर प्रति किलो ८४ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले होते. हे दर जन्माष्टमीच्या दिवशी २६ ऑगस्टला ८५ हजार ६०० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे चांदीचे दरही घसरले आहे.