नागपूर : अंबाझरी तलावालगतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्यानंतर येथे सुरू असलेले काम तात्काळ बंद करून कामाला स्थगिती देण्याचे आदेश आले आहे. त्यामुळे अंबाझरी उद्यान विकसित करण्याचे कंत्राट मिळालेल्या गरुडा ॲम्युझमेंट पार्क. लि.ला मोठा धक्का बसला आहे.

विकासकाने अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी आंबेडकरी समाजाला मोठे आंदोलन उभारावे लागले होते. जव‌ळपास पावणेदोनशे दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून आंदोलकांनी विकासकाला अटक करण्यात यावी आणि २० एकरमध्ये डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – कुपोषण निर्मुलन ‘टास्‍क फोर्स’च्या अध्‍यक्षपदी डॉ. दीपक सावंत

डॉ. आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्रा राज्य पर्यटन विकास महामंडळाने अंबाझरी उद्यान विकास व देखभाल दुरुस्तीच्या कामाला स्थगिती दिली आहे.