विविध भत्ते वाढवण्यासाठी अधिष्ठात्यांना निवेदन

नागपूर : डॉ. नितीन करमळकर समितीच्या शिफारशीनुसार वाढीव भत्त्यासह इतर मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वैद्यकीय शिक्षकांनी गुरुवारी अधिष्ठाता कार्यालयात काळय़ा फिती लावून निदर्शने केली. यावेळी अधिष्ठात्यांच्या माध्यमातून शासनाला तातडीने मागणी मान्य करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या (एमएसएमटीए) बॅनरखाली हे आंदोलन झाले. दुपारी मेडिकलच्या वेगवेगळय़ा विभागातील वैद्यकीय शिक्षक अधिष्ठाता कार्यालय परिसरात गोळा झाले. यावेळी सर्वानी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विरोधी भूमिकेचा निषेध केला. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय शिक्षक न्यायासाठी आंदोलन करत असतानाही शासन त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे त्यांच्यावर  काळय़ा फिती लावून निदर्शने करण्याची वेळ आल्याचे शिक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले.

  यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले गेले. अधिष्ठात्यांनी तातडीने हे निवेदन शासनाला पाठवण्याचे आश्वासन देत रुग्णसेवा प्रभावित होऊ नये या पद्धतीने प्रयत्न  करण्याची विनंती आंदोलकांना केली. यावेळी डॉ. समीर गोलावार, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. अतुल राजकोंडावार, डॉ. सत्यजीत जगताप, डॉ. अमित दिसावाल, डॉ. प्रवीण शिंगाडे यांच्यासह बरेच एमएसएमटीएचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.