पूर्व विदर्भात करोनाचे संक्रमण वाढत असतानाच गेल्या सात दिवसांत डेंग्यूचे ३४ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील आहेत, हे विशेष.

पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत या सहा जिल्ह्यात १ जुलै २०२२ ते ७ जुलै २०२२ दरम्यान डेंग्यूचे ३४ नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक २४ रुग्ण हे केवळ गोंदिया जिल्ह्यातील आहेत. नागपूर जिल्ह्यात ५, वर्धा जिल्ह्यात ५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

हल्ली नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागासह पूर्व विदर्भातील इतरही जिल्ह्यांत डासांचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच सर्वत्र मोठ्या प्रमाणावर किटकनाशकांची फवारणी व इतर उपाय न केल्यास येथे डेंग्यूचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी सर्वाधिक रुग्णांची नोंद –

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये वर्ष २०२१ मध्ये डेंग्यूचे ३ हजार ६२८ रुग्ण आढळले होते. यापैकी २४ रुग्णांचे मृत्यू झाले होते