प्रशांत देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेची चिंता संपेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आज सकाळच्या सत्रात ते बोलत होते. याच वेळी त्यांनी शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा >>>वर्धा: पोलिसांनी अडवली साहित्यप्रेमींची वाट; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. मराठी ज्ञान भाषा आहेच, आता सगळ्या प्रकारचे शिक्षण मराठीतून मिळेल. परिणामी मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार रामदास तडस व डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, समीर मेघे तसेच कार्याध्यक्ष प्रदीप दाते व सागर मेघे यांची उपस्थिती होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis announced 10 crores to vidarbha sahitya sangh on the occasion of centenary year pmd 64 amy
First published on: 05-02-2023 at 12:48 IST