लोकसत्ता टीम

अकोला : शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार ठामपणे उभे आहे. महायुतीचे पुन्हा सरकार येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

मूर्तिजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग, खासदार अनुप धोत्रे, आमदार चित्रा वाघ, आमदार वसंत खंडेलवाल, सुहासिनी धोत्रे आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनांचा पाढा वाचला.

आणखी वाचा-Video : निवडणूक चिन्ह चप्पल, उमेदवार करतो पदस्पर्श, यवतमाळमध्ये अनोखा प्रचार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूरमध्ये ३२५० कोटींचा निधी आणला. उमा बॅरेज, पुनर्वसन आदींसह विविध काम त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमार्फत त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कामे मार्गी लावली. आगामी काळात नोव्हेंबर संपण्याच्या आता आणखी १०० कोटींची कामे मंजूर होतील. समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले.

पोहरादेवी येथे ५०० कोटी रुपयांची विकास कामे केली. ओबीसी, धनगर, भटक्या विमुक्त आदींसह विविध समाज घटकांसाठी महामंडळ आणि विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा दिला. १२ हजार रुपये शेतकरी सन्मान निधी दिले जात आहे. आता १५ हजार देणार आहोत. शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास त्यावेळी फरकाची रक्कम राज्य सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळेल. कृषिपंपाचे बील देखील शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही. पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही.

आणखी वाचा-नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…

राज्यात विकासात्मक कामे पूर्ण करून दाखवले. पाच वर्षांत समृद्धी महामार्ग तयार केला. त्यामुळे उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन मिळून रोजगार निर्मिती होत आहे. नदीजोड प्रकल्पातून ५५० कि.मी.ची नवीन नदी तयार करीत आहे. ८८ हजार कोटीतून १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे काम केले जात आहे. आम्ही स्वप्न मोठी पाहतो. महिलांना सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे केंद्र बनवण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. महाराष्ट्रात ११ लाख लखपती दिदी तयार झाल्या. मुलगी जन्माला आल्याचे स्वागत होण्यासाठी त्या घराला एक लाख मिळत आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सावत्र भावांचे योजना बंद पाडण्याचे प्रयत्न

विरोधकांनी लाडक्या बहीण योजनेची खिल्ली उडवली. मात्र, विरोधकांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये योजनेची पैसे टाकले. आम्ही सख्खे भाऊ तसे सावत्र भाऊ देखील फिरत आहेत. ते योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे समर्थक न्यायालयात गेले, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.

Story img Loader