नागपूर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात घरात बसून  केवळ ‘गरम पाणी प्या आणि स्वस्त बसा’ इतकाच सल्ला दिला. त्यामुळे प्रचारसभांमधून आमच्यावर टोमणे मारून तुम्ही केवळ समाधान मिळवू शकता. मात्र, तुम्हाला मते मिळणार नाहीत. आमचा एक प्रवक्ताही तुम्हाला चर्चेत पाणी पाजेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

सक्करदरा चौकात  भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन मते, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, पीरिपाचे जयदीप कवाडे उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, प्रवासात असताना उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होतो. त्यांनी  त्यांची अडीच वर्षे आणि आमच्या दीड वर्षाच्या कामांवर वादविवाद करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले. मी उद्धव ठाकरेंना सांगतो, तुम्ही अडीच वर्षे केवळ घरात बसून लोकांना समाज माध्यमांवरून गरम पाणी पिण्याचे सल्ले दिले.

Bahujan vikas aghadi hitendra thakur marathi news
बहुजन विकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन; पालकमंत्र्यांच्या नोटिशीची खिल्ली, फडणवीसांवर हल्लाबोल
Sharad pawar on PM narendra Modi in Pune
“तेव्हा मीच मोदींना चार दिवस इस्रायलला नेलं होतं”, जुनी आठवण सांगत शरद पवारांची मोदींवर टीका
CM Eknath Shinde hard work to save Nashik seat Communication with heads of institutions and organizations
नाशिकची जागा वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कसोशीने प्रयत्न; संस्था, संघटनांच्या प्रमुखांशी संवाद
Arvind Kejriwal, Modi, BJP,
केजरीवालांच्या ‘पंचाहत्तरी’च्या यॉर्करमुळे भाजपची दाणादाण
Eknath Shinde, ravindra waikar,
अडचणीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केल्यानेच पक्षप्रवेश, रवींद्र वायकर यांची सारवासारव
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
Ajit Pawar On Rohit Pawar
रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्यावर काहीतरी परिणाम…”
Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…

हेही वाचा >>>“वडेट्टीवारांना पक्षात किंमत नाही, स्वतःच्या मुलीसाठी….”, धर्मरावबाबा आत्राम यांनी चित्रफीतच…

तुमच्यासोबत चर्चा आणि वादविवाद करायला भाजपचा एक प्रवक्ताच पुरेसा आहे. आमचा प्रवक्ता बोलला की तुम्ही चार प्याले पाणी पिऊन खाली बसाल. केवळ टोमणे मारून समाधान मिळेल. मात्र तुम्हाला मते मिळणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षातील कामांची माहिती दिली. जयदीप कवाडे यांनीही यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वर बाळबुधे, आमदार मोहन मते यांचीही भाषणे झाली.

 गडकरी हे मोदींचे सेनापती

नितीन गडकरी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेनापती म्हणून देशभर विकासकामे केली. नागपूर शहराचा चेहरा बदलला. ही देशाची निवडणूक आहे. इंडी आघाडीकडे नेता व नीती दोन्ही नाहीत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.