नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपराजधानीमध्ये जोरदार स्वागत

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले.

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस यांचे उपराजधानीमध्ये जोरदार स्वागत ( प्रतिनिधिक छायाचित्र )

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. विमानतळावर स्वागत केल्यानंतर वर्धामार्गावरील हेडगेवार स्मारकाजवळ त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. तेथून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्कूटर मिरवणूक काढली. रस्त्यादवर दुतर्फा फडणवीस यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर,आमदार आशिष जायस्वाल, आमदार कृष्णा खोपडे आमदार विकास कुंभारे,चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते. मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान मिरवणुकीमुळे वर्धामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका शाळकरी मुलांना बसला.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis is warmly welcomed in the capital amy

Next Story
नागपुरात फडणवीसांचं जंगी स्वागत; कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भारावले; म्हणाले “आज याच प्रेमामुळे…”
फोटो गॅलरी