scorecardresearch

Premium

अमरावती: कर्जाची चौपट परतफेड केल्यावर महिलेचे अश्लील फोटो प्रसारीत

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

repaying loan criminal circulated obscene photos woman amravati
कर्जाची चौपट परतफेड तरीही महिलेचे अश्लील फोटो प्रसारीत (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमरावती: शहरातील एका महिलेला पैशांची आवश्यकता असल्यामुळे तिने एका ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून २२०० रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्या महिलेने तब्बल १० हजार रुपये परत केले. तरीही सायबर गुन्हेगार आणखी पैशांची मागणी करत होते. महिलेने नकार दिला तर तिचे अश्लील छायाचित्र तयार करून तिच्या परिचितांना पाठवले. हा प्रकार समोर येताच महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा नोंदवला.

शहरातील एका महिलेला कर्जाची आवश्यकता होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोबाइलवर ऑनलाइन ‘इझी लोन’ नामक अ‍ॅपची लिंक आली. कुठलेही कागदपत्र न देता, विना साक्षीदार कमीतकमी वेळात कर्ज उपलब्ध करून देण्याची बतावणी करण्यात आली. त्यामुळे महिलेने लिंक उघडून आवश्यक ती माहिती भरली. महिलेने त्या अ‍ॅपच्या माध्यमातून २२०० रुपये कर्ज घेतले. या कर्ज रकमेसोबतच तब्बल दहा हजार रुपयांचा भरणा करूनही सायबर गुन्हेगाराकडून महिलेला अधिक रक्कम भरण्याचा तगादा लावण्यात आला.

tahsildar on contract basis, tahsildar recruitment on contract basis, jalgaon collector office
हद्दच झाली… आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरणे आहे… ‘या’ जिल्ह्याने काढली जाहिरात
FCRA amendment Amit Shah
परकीय देणगी घेणाऱ्या एनजीओंसाठी मोदी सरकारचे नवे नियम
reaction from medical field over centre for zero neet pg cut off decision
शून्य ‘पर्सेटाइल’ असेल, तर परीक्षाच का घ्यायची? ‘नीट पीजी’बाबत केंद्राच्या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी
alcoholic
अट्टल पण छुपा मद्यपी कसा असतो? लक्षणे व उपचार काय? वाचा सविस्तर…

हेही वाचा… ग्रीन ब्रिगेडच्यावतीने यंदा १० हजार वृक्षांची लागवड; वाढत्या उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी संकल्प

त्यानंतर गुन्हेगारांनी महिलेचे छायाचित्र मॉर्फ करून ते अश्लील छायाचित्र महिलेच्या परिचितांना पाठवले. त्यामुळे महिलेची सामाजिक बदनामी झाली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Despite repaying the loan four times the criminal circulated obscene photos of the woman in amravati mma 73 dvr

First published on: 27-06-2023 at 12:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×