अकोला : लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’तील तीन पक्षांशिवाय खोटारडेपणा या चौथ्या पक्षाविरोधात भाजप लढला. गेल्या काही वर्षांपासून विरोधकांकडून ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्यात आला. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होता. या खोटारपडेपणामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. लाडक्या बहीण योजनेमुळे आता आपण पुढे गेलो असून येत्या १७ तारखेला दोन महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार आहोत, अशी घोषणाही देवेंद फडणवीस यांनी केली. अकोला येथे भाजपच्या विस्तारित कार्यकार्यरिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे आदींसह भाजप पदाधिकारी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. हेही वाचा.पाणीसाठा ६९ टक्क्यांवर, विदर्भातील ६ मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग लोकसभा निवडणूक अकोल्याचा गड भाजपने राखला. अकोला हे भाजपचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आता विधानसभा निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. लोकसभेत ‘मविआ’तील तीन पक्षांशिवाय चौथ्याच्या विरोधात भाजप लढली. तो चौथा पक्ष म्हणजे खोटारडेपणा. ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्यात आला. आरक्षण जाणार असा नरेटिव्ह पसरवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला ५० वर्षांसाठीच आरक्षण दिले होते. ते वाढविण्याचे व आरक्षण टिकवण्याचे काम सरकारचे आहे. खोटा नरेटिव्हचा परिणाम विविध समाज घटकात झाला. त्यामुळे विदर्भात भाजपच्या जागा कमी झाल्या. पण जनाधार कमी झालेला नाही. केवळ ०.३ टक्के मते भाजपला कमी पडली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. खोटारडेपणा आता लक्षात येत आहे. दलित, आदिवासींसह इतर समाजाला ही आता लक्षात येत आहे की आपली दिशाभूल करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील वातावरणात बदलले आहे. लाडकी बहिण योजनेमुळे तीन-चार टक्के मतांनी आपण पुढे गेलो. या योजनेचा प्रचंड त्रास विरोधकांना होत आहे. विरोधक सावत्र भाऊ नटवरलाल असून योजनेच्या विरोधात बोलतात आणि स्वत:च्या छायाचित्रासह लाडकी बहिण योजनेचे फलक देखील हेच लावतात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. हेही वाचा.गजानन महाराजांची पालखी स्वगृही, श्रावणधारांत स्वागत; संतनगरी शेगावात… येत्या १७ तारखेला दोन महिन्याचा हप्ता खात्यात टाकणार आहोत. कुठलीही लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही. भाजप कार्यकर्त्यांनी योजनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.