नागपूर : अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हे कोण करीत आहे तपासून बघावे लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य कोणीही करू नये. कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही. या ठिकाणी कधीही औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ शकणार नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, पण हे जे करीत आहेत त्यांना शोधून काढावे लागेल आणि आम्ही लवकरच शोधून काढू. अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण त्यासोबत महाराष्ट्राच्या नावलौकिकाला डाग लागतो. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा – दोन दिवसांत मॉन्सूनचे केरळात आगमन; हवामान विभाग म्हणतंय…

शरद पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ते खपवून घेतले जाणार नाही. ओरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर संताप निर्माण होतोच, फक्त अशा प्रकारच्या संतापामध्ये कायदा हातात घेणे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on aurangzeb on nagpur airport vmb 67 ssb
First published on: 07-06-2023 at 17:26 IST