Devendra Fadnavis On Kumbh Mela Planning : नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज इथल्या महाकुंभ पाठोपाठ २०२६-२७ ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिकमध्ये २०२७ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यंदा कुंभमेळ्याचे पर्व १८ महिन्याचे असणार आहे. त्यात २०२७ च्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये म्हणजेच श्रावण महिन्यात तीन शाही स्नान होणार आहेत.
कुंभमेळाव्यामध्ये शाही स्नानाला महत्त्व असते. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाव्यात शाही स्नान त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंडात आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी रामकुंडात होईल. मात्र, एकाच वेळी पाचशे लोकही स्नान करण्याची येथे सोय नाही. त्यामुळे लाखोंच्या संख्येने येणारे नागरिकांची सोय कशी करणार?, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नागपूरमध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
या आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा ठरल्या. पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ला, दूसरे ३१ ऑगस्ट २०२७ नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच दिवशी, तर नाशकातील पर्वणीचे तृतीय अमृतस्नान ११ सप्टेंबर २०२७ रोजी, त्र्यंबकेश्वर पर्वणीतील तृतीय अमृतस्नान १२ सप्टेंबर २०२७ ला होणार आहे. नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची अमृतस्नान पर्वणीच्या तारखा निश्चितीसाठीची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ या दिवशी होणार असल्याने त्या दिवसापासून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. त्रिखंडी कुंभमेळा २२ महिने चालणार नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळा १३ महिन्यांचा असतो. मात्र, यंदा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याने २२ महिने चालणार आहे. असा योग नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ७१ वर्षांनी येणार आहे.
नेमके काय म्हणाले फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंडात आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी रामकुंडात येथे केवळ प्रत्येकी ५०० लोक एका वेळेस स्नान करू शकतील इतकीच व्यवस्था आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांना मूळ ठिकाणी स्नान करायला मिळणे अशक्य असले तरी आपण अनेक प्रकृतिक कुंड तयार करणार असून तेथे स्नान करताना रामकुंड आणि कुशावर्त कुंड येथे स्नान केल्याचे अनुभूती भाविकांना येणार आहे. यासाठी हजारो हेक्टर जागा उपलब्ध आहे. त्यावरही सुविधा केली जाणार आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
