scorecardresearch

Premium

राज्यात शांतता राखण्यात फडणवीस अपयशी – नाना पटोले

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात शांतता कायम ठेवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Investigate Meera Borwankar allegations
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवार यांच्यावर टीका (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : विद्वेष निर्माण करून भाजप समाजात विष कालवत असल्याचा आरोप करीत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात शांतता कायम ठेवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. बुधवारी पत्रकारांशी ते नागपुरात बोलत होते.

priyanka gandhi
छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना : प्रियंका
bjp flag
मध्य प्रदेशात घरटी एक नोकरी देण्याचे भाजपचे आश्वासन
Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार
amit shah and sonia gandhi
अमित शाह ते सोनिया गांधी, १७ सप्टेंबरला तेलंगणात वेगवेगळ्या पक्षांचे शक्तिप्रदर्शन!

पटोले म्हणाले, फडणवीस यांनी आव्हान स्वीकारून समाजासमाजात सुरू असलेले वाद दूर करावे. भाजप राजकीय लाभ मिळवण्यााठी समाजा-समाजात संघर्षाची स्थिती निर्माण करण्याची चूक करीत आहे. याचा प्रभाव राज्यातील राजकारण निश्चित होणार आहे. भाजपविरोधात जनतेत असंतोष आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मुंडे यांची काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, त्यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याची बाब लपून राहिलेली नाही.

आणखी वाचा-‘पुढच्या वर्षी लवकर या’चे साकडे घालत गणरायाला भावपूर्ण निरोप; कृत्रिम तलावाला नागपुराकरांचा प्रतिसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक त्यांचा परदेश दौरा रद्द केल्याबद्दल ते म्हणाले, ही घटनाबाह्य सरकार आहे. त्यांचा दौरा रद्द होणे हे सरकार पडण्याचे संकेत आहेत. भाजपने इतर पक्षांना फोडण्याचे राजकारण केले. पण, नजिकच्या काळात त्यांच्यात फुट पडण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis failed to maintain peace in the state says nana patole rbt 74 mrj

First published on: 28-09-2023 at 17:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×