नागपूर : नाशिकमध्ये खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ती गाडी विहिरीत पडली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर फोनवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती देखील सांगितली. खरं म्हणजे इतक्या लहान मुलांचं असं दुर्दैवी निधन होणार कुठलंच असू शकत नाही. ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि मध्यभागी ती विहीर होती. त्यामुळे ही घटना घडल्याचा प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येते आहे.

या संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिमे संवेदना व्यक्त करतो आपण त्या लोकांना मदत घोषित केलेल्या पण त्यासोबत एक अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी आहेत असं कुठे रहदारी असेल तर तात्काळ त्याचा ऑडिट करून त्याला आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील.

रहदारी असलेल्या मार्गावरील विहरीचे अंकेक्षण

घटनेमुळे इथे असं लक्षात आलं की भिंत होते पण ती छोटी. होती ती कदाचित मोठी असती तर ते वाचू शकले असते. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे रहदारी मार्गावरील विहरीचे अंकेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशी आहे. या मुलांच्या कुटुंबाप्रति मी संवेदना व्यक्त करतो.

बारामती पोटनिवडणूकीवर म्हणाले…

बारामती निवडणुकीवर असं वाटतं की सर्वच पक्षांनी सोनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिती होईल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केल्या आहेत मला आठवते की जेव्हा आर. आर. पाटील (आबा) यांचे दुखद निधन झालं होतं, त्याही वेळेस ती फोटो निवडणूक भाजप आणि आम्ही ठरवलं होतं की लढणार नाही आणि ते बिनविरोध केली होती. मला वाटतं सर्वच पक्षांनी मन मोठं करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.